महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचा वार्षिक समारोप व सत्कार समारंभ संपन्न

नाशिक l प्रतिनिधी:- प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक मार्गदर्शनाखाली आणि बॉश लिमिटेड यांच्या सहकार्याने युनायटेड वे मुंबई सामाजिक संस्थेचा रस्ता सुरक्षा जनजागृती प्रकल्प BRACE- बॉश रोड सेफ्टी अवेअरनेस आणि कम्युनिटी एंगेजमेंट प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जनजागृती प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा क्लब तयार करून २०० रस्ता सुरक्षा आंबेसेडर च्या साह्याने नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी रिस्पेक्ट द स्टॉप लाइन, हेल्मेट फॉर लाइफ, रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली, पथनाट्य, तसेच रस्त्यावर जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांना रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली सदर २०० रस्ता सुरक्षा आंबेसेडरयांनी वर्षभर राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचा वार्षिक समारोप व सत्कार समारंभ प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध जनजागृती मोहिमा राबवून ८००० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. प्रदीप शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती. राजश्री गुंड मॅडम यांच्या मोलाच्या सहकार्याने तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. मनीष दौंड, मा. सचिन बोधले सर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मा. विलास चौधरी सर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत युनायटेड मुंबईचे असिस्टंट मॅनेजर करण देसाई यांनी केले.
या कार्यक्रमाला कॉलेजचे प्रतिनिधी अनिल दुबे, दत्ता पावसे, रोहित भास्कर, गीतांजली एंडाईत, भूपेंद्र अहिरराव आणि आनंद भोसले उपस्थित होते. 

वर्षभरात राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सदर कार्यक्रमात कथन केले. 
यावेळी श्रीमती. राजश्री गुंड मॅडम यांनी युनायटेड वे मुंबई व बॉस लिमिटेड यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा उपक्रमाचे, व संस्थेचे कौतुक केले आणि पुढील रस्ता सुरक्षा उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्ता सुरक्षा अभियानात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आव्हान त्यांनी केले तसेच, सदर प्रकल्पाच्या कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात वर्षभराच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांचा वार्षिक अहवाल युनायटेड वे मुंबईचे एक्झिक्युटिव्ह रोहित दळवी यांनी सादर केला.

या रस्ता सुरक्षा उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्य करणारे महाविद्यालय खालील प्रमाणे. 
1. एम व्ही पी विधी महाविद्यालय. 
2. एम व्ही पी फार्मसी महाविद्यालय.
3. डॉ. एम एस गोसावी फार्मसी महाविद्यालय.
4. संदीप इन्स्टिटयूट ऑफ इंजि. महाविद्यालय. 
5. संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालय.
6. नॅशनल सिनियर महाविद्यालय 
7. के के वाघ इंजि. महाविद्यालय 
8. एम ई टी फार्मसी महाविद्यालय.
9. बिटको महाविद्यालय नाशिक रोड 
10. के व्ही एन नाईक इंजि. महाविद्यालय.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली नेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प समन्वयक सदाशिव गणगे यांनी केले.
या कार्यक्रमास युनायटेड वे मुंबई संस्थेचे प्रतिभा पवार, राकेश ढाकणे, विकी उबाळे, राजेश घाटोळ, पुष्पावती टोपले, कोमल शिंदे आणि सुवर्णा पाटील यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. सर्वांच्या सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने