महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी रामशेज येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिर उत्साहातविविध शासकीय दाखल्यांचे वितरण; नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा – अपर आयुक्त जितेंद्र वाघ

दिंडोरी l मनोज पाटील:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत रामशेज मंडळातील विशेष शिबिर आज मंडळ अधिकारी कार्यालय, रामशेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे तसेच शासनाच्या विविध योजनांच्या 803 लाभांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथील अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी, दिंडोरी डॉ. आप्पासाहेब शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिरस्तेदार, उपविभागीय कार्यालय दिंडोरी सौ. मंदाकिनी काथेपुरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी
 गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सबरजिष्टर संदीप भुसारी,भूमिअभिलेख चे किशोर गायकवाड ,रामशेज (आशेवाडी) चे सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच कैलास सानप, दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाम बोडके, पोलीस पाटील सौ. सुनिता बोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय मुरलीधर बोडके,लक्ष्मण गायकवाड, खतवड चे उपसरपंच सुखदेव खुर्दळ,रामशेज चे माजी उपसरपंच संजय बोडके, दशरथ बोडके, कचेश्वर बोडके, संदीप कापसे यांच्यासह रामशेज मंडळातील विविध गावांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुधारित तुकडे बंदी धोरण, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/शेत रस्ते योजना, सुधारित बिनशेती बाबतची माहिती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम 85 अन्वये शेत जमिनीचे वाटप, सलोखा योजना तसेच पोट खराब बाबतची कार्यवाही अशा विविध योजना, उपक्रम व नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शिबिरात विविध शासकीय दाखले तसेच शासनाच्या योजनांच्या लाभांचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार मंडळ अधिकारी रामशेज श्री. पी. एन. बांडे यांनी मानले. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने