दिंडोरी । प्रतिनिधी:-परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड आणि ग्रामपंचायत अवनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा प्रतिसाद लाभला.
प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, उपसरपंच विनायक निकम, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश मोरे, निलेश वाघळे, कैलास जाधव आदी मान्यंवर उपस्थित होते. यावेळी साईनाथ ब्लड बँक नाशिक चे कर्मचारी, चव्हाण हॉस्पिटल चे सर्व टीम व वोक्हार्ट फाउंडेशन टीम चे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना विविध विषयावर तज्ञ डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये अवनखेड व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामध्ये एकूण 582 नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. तसेच या शिबिरात देण्यात येणार्या सेवा जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, दंतरोग तपासणी, बालरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, कान नाक-घसा तपासणी, रक्त तपासणी, रक्तदान, डोळे तपासणी अशा विविध सेवा तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच नागरिकांना मोफत देखील चष्मे वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे फस्ट एड किट वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध विषयांवर आरोग्य विषयक जनजागृती सत्र घेण्यात आले. याप्रसंगी वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार, जनरल तपासणी डॉ. संजय देशमुख, स्त्रीरोग तज्ञ डॉ.परिमल चव्हाण, नेत्ररोग तज्ञ.सुरेश थोरे, दंतरोग तज्ञ डॉ. कस्तुरी दायमा, फार्मासिस्ट स्नेहा जाधव, लॅब टेक्निशियन कैलास वसावे, ज्योती मोगल, नर्स पुष्पा शार्दुल, छाया सोनवणेे, धनश्री बोरस्ते आदी उपस्थित होते.