महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नाशिक जिल्ह्यात कॅन्सर तपासणी मोहीम; त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी विशेष शिबिर

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यात संपूर्ण जिल्हाभर कॅन्सर तपासणी मोहीम सुरू असून कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून अनेक रुग्णांची कर्करोग तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत निदान व उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक ३० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उप जिल्हा रुग्णालय त्र्यंबक येथे विशेष कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार शिंपी तसेच उप जिल्हा रुग्णालय त्र्यंबकचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

सदर शिबिरामध्ये नागरिकांची प्राथमिक कर्करोग तपासणी करण्यात येणार असून गरजेनुसार पुढील उपचार व मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने