महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बेडसे शाश्वत पाणीपुरवठा वृद्धीकरण प्रकल्प उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न .

बा-हे l नामदेव पाडवी:- बेडसे, ता. सुरगाणा, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत | दिनांक २१ जून २०२६: बेडसे शाश्वत पाणीपुरवठा वृद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा जलथॉन २०२६ अंतर्गत तुर वाद्य, संभळ काहळी वाद्य पारंपरिक वाद्य वाजवून नृत्य मिवणूक काढत मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे वर्तकनगर, यांचे आर्थिक सहकार्य लाभले असून, कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विशाल ठोंबरे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे वर्तकनगर, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमती अंजली सावंत, सचिव, रोटरी क्लब ऑफ वर्तकनगर, ठाणे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच जयेश निशांदर, श्रीमती शिल्पकला देशपांडे, मंगेश कुलकर्णी आणि पराग शहा यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाचे आयोजन जलपरिषद मित्र परिवार, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), मुंबई, ऋणमुक्त सेवाभावी फाऊंडेशन, नाशिक, आयडियाझम सोशल ऑर्गनायझेशन, नाशिक आणि भारतीय जलकार्य संघटना (Indian Water Works Association) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रकल्पासाठी प्रा. प्रवीण चौधरी (VJTI), इंजी. प्रसाद बोडस आणि इंजी. दीपक गुप्ते यांनी तांत्रिक सहकार्य प्रदान केले. तसेच रोटरी क्लब ऑफ वर्तकनगर, ठाणे यांनी पुरस्कार सहयोगी म्हणून सहभाग नोंदविला.
या प्रकल्पात VJTI मधील विद्यार्थी सागर जाधव, आकाश कन्नूरकर, वैभव आव्हाड, सुरज बहिराम, सुधांशु धारणे, जान्हवी शिराळे, श्वेता पाटील आणि ऋचा केंद्रे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रकल्पाच्या नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच दीपाली चौधरी यांनीही उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमात “एक गाव – एक जलआराखडा” आणि “शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी सामूहिक सहभाग” या संकल्पनांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी जलथॉन २०२६ उपक्रमाचे आयडियाझमचे अध्यक्ष नारायण गभाले यांनी सूत्रसंचालन केले जलपरिषद तर्फे देविदास कामडी यांनी प्रास्ताविक सुरुवात जलथॉन कार्यक्रमाचे उद्देश सांगून,जलपरिषदेचे कार्य,इतर सामाजिक संस्थानी केलेली मदत आणि त्यांचे कार्य,मदत केलेल्या लोकांचा उल्लेख आणि त्यांचे अभिनंदन,भविष्याचे कामाविषयीचे नियोजन आणि शेवटी पुन्हा जलथॉन मध्ये लोकाना सहभाग होण्याचे आव्हान आणि शेवट,ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषण प्रा. प्रविण चौधरी यांनी जलथॉन २०२६ जल लसंवर्धन आराखडा पाणी नियोजन,हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी जलथॉन २०२६ तांत्रिक पथकास गावाचे तांत्रिक भागीदार म्हणून आमंत्रित केले आहे. ग्रामपंचायतींनी स्थापन केलेल्या जलमित्र टीमची नोंदणी पूर्ण करून अर्ज VJTI, मुंबई आणि जलपरिषद मित्र परिवार यांच्याकडे सादर केले आहेत. या उपक्रमाद्वारे गावांच्या जलव्यवस्थापन व हवामान बदलासंदर्भातील तयारीस बळकटी मिळणार आहे.यासाठी ग्रामपंचायतशी संपर्क, जलमित्र नोंदणी, गांवभेटी, विविध उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी ऑन ग्राउंड काम जलथॉन २०२६ उपक्रमातला यशस्वी करण्यासाठी भूमिका अधोरेखित केली. जलथॉन तांत्रिक पथक यांची प्रभावी सहकार्य राहील, जलथॉन २०२६ उपक्रमास VJIT चे संचालक डॉ. सचिन कोरे यांचे मार्गदर्शन Bentley वॉटरगेम्स सॉफ्टवेअर कार्यशाळा,आले. जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२६ रोजी डॉ. सुमेध म्हस्के, विभागप्रमुख स्थापत्य व पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, VJIT यांच्या हस्ते उपक्रमाचे अधिकृत उदघाटन करण्यात आले. जलथॉन २०२६ या उपक्रमात www.jalnx.in हे पोर्टल समुदाय सेवेसाठी खुले करण्यात येईल या पोर्टलवर सहभागी गांवाचे जलआराखडे, पाणी विषयक समस्या आणि विकास प्रकल्प प्रदर्शीत केले जातील. स्वयंसेवक, ङो, CSR संस्था, निधीदार यांना गावांच्या गरजा समजून प्रकल्प दत्तक घेणे, सहकार्य करणे हे सॉफ्टवेर प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.सामाजिक संस्था यांचा सहभाग जलमित्राचे प्रशिक्षण यांचा संपूर्ण लेखाजोखा याची संपूर्ण माहिती देण्यात आली.
यावेळी बेडसे गावातील महिला, ग्रामस्थ यांनी जलथॉन २०२६ उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल ११ गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेडसे ग्रामस्थ, भाटी, खिर्डी, चिंचपाडा (खोकरविहीर ), चिऱ्याचापाडा (खोकरविहीर ), बेडसे, केळावण, ठाणगाव, भेनशेत, आमदा(बाऱ्हे ), गुरटेंबी, कळमणे गावातील जलमित्र टीमचा सन्मान करण्यात आला उपस्थित भाऊ भोंडवे सर सरपंच बेडसे, शिवराम वळवी सरपंच खिर्डी, विजय चौधरी पोलीस पाटील केळावण,रमेश पडेर सर बेडसे,बाबुराव अलबाड पोलीस पाटील बेडसे,युवराज खोटरे, जयप्रकाश महाले ठाणगाव, सयाजी पवार बेडसे, पत्रकार नामदेव पाडवी, हंसराज भोये, सुभाष वाघमारे, उपसरपंच बेडसे पुंडलिक पडेर, कैलास अलबाड जेसीबी ड्रायव्हर बेडसे,जलपरिषद चे गीतेश्वर खोटरे, राकेश दळवी, दुर्वादास गायकवाड,नारायण गभाले, संकेत धेनक,देविदास कामडी, संजय गवळी ऋणानुबंध उमेश महाले,भाऊ लोखंडे, एकनाथ पवार सर्व उपस्थित ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळी खिर्डी, बेडसे, बाऱ्हे, कळमणे सरपंच उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने