महाराष्ट्र ट्रायबल न्युज

संकल्प आदिवासी युवा संघटनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा संपन्न.

अलंगुण l प्रतिनिधी:-
      आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात मार्गदर्शनासह  *विद्यार्थी गुणगौरव सोहळा* कार्यक्रम दि.18 जुलै -2026 रोजी एम.जे.एम महाविद्यालय करंजाळी ता. पेठ येथे उत्साहात पार पडला.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेचे अध्यक्ष चेतन खंबाईत यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि सर्व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. संकल्प आदिवासी संस्थेचा 20 वर्षाचा प्रवास व वाटचाल कशी झाली हे त्यांनी प्रास्ताविकातून नमूद केले.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.आ.वि.प्रकल्प नाशिक येथील सहायक प्रकल्प अधिकारी मा. राजेंद्र महाले साहेब होते . करियर विषयक मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, डॉ. राजेंद्र बोरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, प्रिया मकासरे मॅडम, प्राचार्य शिंदे सर , सामाजिक कार्येकर्ते सुधाकर राऊत, पुंडलिक सातपुते, गणपत चौधरी व मनोहर टोपले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या  कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे NDPT सोसायटीचे अध्यक्ष दिलीप भुसारे, यशवंत गावंडे, नगरसेवक जितेंद्र जाधव, नितीन गायकवाड, अनिल बोरसे आदी उपस्थित होते .
          कार्यक्रमात 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात पदवीप्राप्त गुणवंतांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
         कार्यक्रमाचे आभार संकल्प संघटनेचे तालुकाध्यक्ष गौरव चौधरी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्पचे टीमचे पदाधिकारी कांतीलाल नाठे, किरण खंबाईत , राजेंद्र गांगोडे , अनिल जाधव  , मनोहर खंबाईत, ज्ञानेश्वर गावित, कांतीलाल मोरे , राकेश गांगुडे, मनोज खंबाईत यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने