महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अलंगुण गावशेजारील बारसेमाळ रस्त्यावर दरड कोसळली; वाहतुकीला धोका

अलंगुण l प्रतिनिधी : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अलंगुण गावाशेजारील बारसेमाळ रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे डोंगरकडील माती व दगड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधित प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली असून दरड हटविण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने