अलंगुण l कृष्णा पवार :-चाईल्ड सव्हाईव्हल इंडिया, परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, शिवारपाडा ग्रामपंचायत आणि इंडियन डेंटल असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवारपाडा येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ८६ ग्रामस्थांची दंत तपासणी करण्यात आली. तसेच सहभागी नागरिकांना योग्य पद्धतीने दात घासण्याची पद्धत, तोंडाची स्वच्छता राखणे आणि दातांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना मोफत औषधे, टूथब्रश आणि टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अशा आरोग्यविषयक शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी चाईल्ड सव्हाईव्हल इंडिया संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. अमोल येवला, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण, प्रवीण बैरागी तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. रेवती मुळे, डॉ. किशोर मुळे, डॉ. प्राची देवरे, डॉ. श्रुती भामरे, डॉ. आदिती सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.