महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नाळीद येथे हर्षल फाउंडेशन व बिनधास्त जिंदगी फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य व गणवेश वाटप

कळवण l प्रतिनिधी:-हर्षल फाउंडेशन, देवळा व बिनधास्त जिंदगी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाळीद येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचे वाटप उत्साहात पार पडले. हर्षल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय हरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागून त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
     या सामाजिक उपक्रमास नाळीदचे सरपंच बाळू बाबुराव पवार, पोलीस पाटील धनराज आनंदा पवार, सौ. मंदाबाई धनराज पवार, माजी डी.वाय.एस.पी. बाबुराव गावीत, ज्येष्ठ नागरिक बळीराम नामदेव गावीत, प्रगतिशील शेतकरी देवराम नामदेव गावीत, सोमनाथ बाजीराव वाघ, नंदन आमृता गावीत, बाळू धवळू भान्सी, काळू तुकाराम बागुल, उपसरपंच सौ. हिराबाई पुंडलिक वाघ व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तसेच हर्षल फाउंडेशनचे सचिव कु. सृष्टी संजय गायकवाड, खजिनदार सौ. हेमलता संजय गायकवाड व जनसंपर्क अधिकारी दिलीप आनंदा निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यासोबतच माध्यमिक विद्यालय नाळीदचे हरिश्चंद्र पंडित गवळी, मुख्याध्यापक नितीन आव्हाड, माळी कन्हैयालाल, अशोक शिरोळे, मनोज पाटील, सौ. अनिता निकम, मुकेश भामरे, मुख्याध्यापक खरे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय नाळीदचे शेजवळ सर, हिरे सर, देवरे सर आणि गावातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन्ही फाउंडेशनच्या संयुक्त उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मदत अत्यंत मोलाची असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता निकम यांनी केले, तर अशोक शिरोळे यांनी आभार मानले. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने