बोरगाव/अलंगुण l प्रतिनिधी:- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, डोल्हारे येथे सन २०२६-२७ च्या शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले.
या स्पर्धेस तालुका समन्वयक सदगीर सर, गावीत सर तसेच कुकुडणे शाळेचे मुख्याध्यापक आर. जी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून दातीर सर, देशमुख सर व तुंबडा सर यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून यु. एल. वाघमारे व जी. सी. गावीत यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन डी. के. पागी सर यांनी केले.
कबड्डीच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटात चिंचला अनुदानित आश्रमशाळेच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर गुही आश्रमशाळेचा संघ उपविजेता ठरला. मुलींच्या गटात अलंगून अनुदानित आश्रमशाळेने बाजी मारत विजेतेपद मिळविले. बोरपाडा शासकीय आश्रमशाळेचा संघ उपविजेता ठरला.
सामन्यांदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चुरशीच्या लढती रंगवल्या. विजयी संघांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एन. पी. पाडवी, ए. ए. पाईकराव, एन. एम. चौधरी, बोरसे दादा, वाघमारे दादा, जाधव सर, भोये मॅडम, देशमुख मॅडम, बागुल मॅडम, फळंजी मॅडम, झोले सर तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.