दिंडोरी l प्रतिनिधी: दिंडोरी येथे दि. १४ ऑक्टोबर २०२६ युनाइटेड वे मुबंई सामाजिक संस्था व बॉश तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले लायसन्सधारकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
दिंडोरी : स्वतःला सुरक्षित ठेवणे, सुरक्षित चालविणे, वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ता अपघातांमध्ये घट घडवून आणण्याच्या उद्देशाने आज दिंडोरी येथे वाहन चालक परवाना धारकांना रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वाहनचालकांना सुरक्षित ड्रायव्हिंगचे नियम, वाहतूक शिस्त आणि सामाजिक जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आर टी ओ चे मा. ज्ञानेश्वर निकम IMV, समन्वयक सदाशिव गणगे रस्ता सुरक्षा प्रक्षीक्षक वैशाली नेवे, राकेश ढाकणे, विकी उबाळे तसेच, समन्वयक रूपेश तुपे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत, नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, असे सांगण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान सहभागीना वाहन चालवताना सुरक्षित राहण्यासाठी व रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
"सुरक्षित वाहनचालना हीच स्वतःची व इतरांची सुरक्षिततेची खरी हमी असून, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे," असा संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.