महाराष्ट्र ट्रायबल न्युज

निळवंडी येथे उद्या सत्कार व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

दिंडोरी l प्रतिनिधी:- निळवंडी ता दिंडोरी येथे उद्या ता.११/१०/२०२६ रोजी सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रा नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष विकास धात्रक यांनी दिली आहे.
    दिंडोरी ता.कॉंग्रेस आयोजित कार्यक्रमात निळवंडी येथील गुणवंत विद्यार्थी व युवक कु दिशा पाटील, तलाठी सागर गवारी,प्रफुल्ल गवारे,उत्कर्ष गवारी ,भूषण बेंडकुळे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे तसेच काँग्रेस पक्षात विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे . कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व विविध सेलचे प्रमुख ,निळवंडी परिसरातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकानी केले आहे
तसेच दुष्काळ पार्श्वभूमीवर फक्त वैचारिक संवाद होणार असून कोणीही शाल बुके तथा सत्कार साहित्य आणू नये असे विनम्र आवाहन तालुका अध्यक्ष डॉ नारायण पाटील यांनी केले आहे 
(फोटो -नारायण पाटील )

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने