दिंडोरी l प्रतिनिधी:- सोमवार दिनांक 19 ऑक्टोंबर 20 26 रोजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दिंडोरी या ठिकाणी खो खो मुली स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी खेळाच्या माध्यमातून आपला विकास साधून आपले शरीर स्वस्त आणि निरोगी बनवावे असे प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ यांनी आपले प्रास्ताविकात मत मांडलेआणि सर्वांचे यावेळीं स्वागत आणि सत्कार केला. यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे सुजित मुरकुटे,प्रशांत पाटील,संतोष कथार ,प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ,नाशिक क्रीडा समितीचे खजिनदार डॉ दिनेश कराड,उपसचिव राजाराम कारे,स्वप्नील कर्पे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले आंतर महाविद्यालयीन खो खो मुली स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 16 महाविद्यालयातील 177 खेळाडू मुलींनी सहभाग नोंदवला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण नाना जाधव म वि प्र संचालक नाशिक यांच्या हस्ते अंतिम सामन्याचे नाणेफेक पंचवटी विरुद्ध चांदवड सामन्याची सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांनी विध्यार्थी खेळाडूंची ओळख करून त्यांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या पंचवटी संघाने चांदवड संघावर एकतर्फी 12 गुणांनी विजय मिळवून विजय संपादन केला तर चांदवड महाविद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले यावेळली निवड समिती सदस्य म्हणून प्रा बंडू कोल्हे,प्रा जगदीश गुरुळे,डॉ कासार राजेश यांनी कालकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रवींद्र चव्हाण यांनी केले तर आभार प्रा मोशीन शहा याने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयांचे उपप्राचार्य प्रा आर आर झोमन, नॅक समन्वयक अनिरुद्ध भगत,प्रा गौरव सोमवंशी , श्री एस के पगार कार्यालयीन अधीक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी ,विदयार्थी यांनी परिश्रम घेतले
म वि प्र कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय खो - खो मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0