अलंगुण l प्रतिनिधी:- दिनांक 8 नोव्हेंबर 2026 रोजी सुरगाणा येथे माणी रोड वरील चौकाचे आद्यक्रांतीकारक, सह्याद्रीचा ढाण्या वाघ, राघोजी भांगरे यांच्या जयंतीच्या निम्मिताने राघोजी भांगरे चौकाचे फलकाचा अनावरण सोहळा श्री. रंजित गावित. तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सुरगाणा यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरगाणा तालुक्यात मागील काही दिवसात सदर चौकाचे नामकरण करण्याचा प्रयत्न काही आदिवासी विरोधी लोकांनी केला होता त्यावेळी पक्ष विसरून संपूर्ण सुरगाणा तालुक्यात सदर नामकरणाला विरोध श्री. रंजित गावित यांनीच केला होता त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील युवा वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला होता.सुरगाणा तालुक्यात आदिवासी अस्मिता जपण्यासाठी श्री. रंजित गावित नेहमीच अग्रेसर असतात यावेळी देखील त्यांनी समाजविरोधकांना इशारा दिला होता की, जर आदिवासी अस्मिता, आदिवासी शान, आदिवासीचाच नव्हे संपूर्ण देशात सर्व प्रथम ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारा पहिला मान ज्यांना आहे ते आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या बाबत कुठलेही आदिवासी समाज सहन करणार नाही असा इशारा दिला होता त्याला संपूर्ण तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता.
दिनांक 8 नोव्हेंबर 2026 रोजी राघोजी भांगरे यांच्या 201 व्या जयंती निम्मिताने सुरगाण्यात जयंती साजरी करून फलक अनावरण श्री. रंजित गावित यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी श्री. यशोधन चौधरी, युवानेते,श्री. गितेश धूम तालुकाध्यक्ष आदिवासी विकास परिषद, श्री.निलेश करवंदे, उधोजक सुरगाणा,गुलाब पवार, छगन म्हसे,नयन पवार, परशराम बिरारी,धर्मेंद्र चौरे,गोविंद महाले,प्रभाकर चौरे,देविदास थवील,दौलत जाधव,खेमराज चौरे,सुरेश पवार,चेतन गायकवाड,विजय गायकवाड,यशवंत देशमुख,राहुल शेवरे, हरेश गवळी, पोपट पवार, प्रेमराज पवार, मधूभाऊ,आदी युवक उपस्थित होते.