दिंडोरी l प्रतिनिधी:-क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे विद्यालयात भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रकल्प स्वरूपात संविधानाची माहिती विद्यार्थ्यांनी लिहीली . त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन केले, संविधान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे मूल्य रुजवण्यासाठी स्वातंत्र्य ,समता, बंधुता याची माहिती सांगण्यात आली विद्यार्थ्यांनी चित्रकला, वकृत्व, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अनिल ताडगे, श्रीमती गंगावणे , श्री नागरे सर, श्री शिरसाठ सर, श्री सानप सर, श्री.शरद सांगळे, श्री. राजू नवाळे इत्यादी. उपस्थित होते