महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वनारवाडी-मडकीजांब येथे पाणी सुरक्षा नियोजन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

अवनखेड l प्रतिनिधी:- दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी-मडकीजांब येथील ग्रामपंचायतीमध्ये *पर्नोर्ड रेकॉर्ड इंडिया* व इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन (ईएसएफ यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी सुरक्षा नियोजन वॉटर सेफ्टी प्लॅनिंग – डब्ल्यूएसपी विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात जलसुरक्षा योजना म्हणजे काय, तिची उद्दिष्टे, धोके ओळखणे, पाणी नमुने तपासणी, सॅटेलाइट मॅपद्वारे स्रोतांचा आढावा, तसेच “कार्ड खेळ” पद्धतीने संभाव्य धोक्यांचे विश्लेषण अशा व्यावहारिक घटकांचा समावेश होता; या प्रशिक्षणामुळे वनारवाडी व मडकीजांब या गावांना आरोग्यात लक्षणीय सुधारणा अतिसार, कॉलरा, टायफॉइड यांसारखे जलजन्य रोग कमी होणे, महिला व मुलांचे आरोग्य सुधारण, पाणीपुरवठा टिकाऊ व विश्वासार्ह होणे नियमित तपासणी-देखभालीमुळे पायाभूत सुविधा टिकणे, पाणी नमुने तपासणी व जलसुरक्षा समिती/वॉटर चॅम्पियन यांच्या माध्यमातून गुणवत्तेवर लक्ष ठेवणे, ग्रामपंचायतीची क्षमता व शासनव्यस्था मजबूत होणे ग्राम पाणी व स्वच्छता समिती अधिक प्रभावी बनणे, सॅटेलाइट मॅप व जल बजेटिंगद्वारे शास्त्रशुद्ध नियोजन, आर्थिक व सामाजिक फायदे वैद्यकीय खर्च व कामाचे तास वाचणे, महिलांचा वेळ शिक्षण/कौशल्यविकासासाठी मोकळा होणे आणि शाश्वतता व भविष्यातील तयारी हवामान बदल, अनियमित मानसून व भूजल घट यांना लवचिकपणे तोंड देणे, जलस्रोत संरक्षण व ग्रे-वॉटर व्यवस्थापनाचा समावेश ग्रामविकासाच्या योजनेत करणे असे दीर्घकालीन फायदे अपेक्षित आहेत; या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती, दिंडोरीचे उपसभापती व वनारवाडी गावचे उपसरपंच श्री दत्तात्रेय भेरे म्हणाले, “पाणी सुरक्षा नियोजन प्रशिक्षणामुळे गावाला पाणीपुरवठ्यातील संभाव्य धोके आधीच ओळखता येतात आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करता येतात, यामुळे गावात स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते, जलजन्य रोग कमी होतात आणि ग्रामपंचायतीची पाणी व्यवस्थापन क्षमता मजबूत होते; असे प्रशिक्षण प्रत्येक गावाने घेणे आवश्यक आहे, कारण त्यातून दीर्घकाळ टिकणारा, सुरक्षित व शाश्वत पाणीपुरवठा शक्य होतो”; तसेच या प्रशिक्षणावेळी निगडोळ गावचे पाणीपुरवठा कर्मचारी नवनाथ मालसाने यांनीही गावकऱ्यांना सुरक्षित पाण्याचा वापर याबाबत मार्गदर्शन केले; या कार्यक्रमास ईएसएफ च्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी, कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरीचे उपसभापती, वनारवाडीचे उपसरपंच दत्तात्रेय भेरे, सरपंच संगीता मोरे, मडकीजांबच्या सरपंच रोहिणी मोरे, उपसरपंच अनिल वडजे, ग्रामपंचायत अधिकारी समाधान शेवाळे, सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते, तर ईएसएफ च्या फिल्ड स्टाफपैकी तृप्ती पाटील, ओम डोकफोडे, गायत्री चव्हाण, सुमेध मोरे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने