खासदार भास्कर भगरे यांचा शिफारस व पाठपुरावा
मुख्य संपादक - मनोज पाटील
दिंडोरी- विविध आजाराचे उपचारासाठी गरजू 35 रुग्णांना खासदार भास्कर भगरे यांच्या शिफारस व पाठपुराव्याने पंतप्रधान सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 3 लाख या प्रमाने एक कोटी 5 लाखाची मदत गरजू रुग्णांना झाली आहे.
खासदारांचे शिफारसी नुसार वर्षभरात 35 गरजू रुग्णांना काही दुर्धर आजाराचे उपचारासाठी तीन लाखाची मदत मिळते भास्कर भगरे हे निवडून येताच त्यांनी गरजूना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. एकूण 49 गरजू रुग्णांनी मदतीसाठी अर्ज केले होते त्यातील 35 अर्ज मंजूर झाले असून 7 अर्ज प्रतीक्षेत असून एप्रिल नंतर त्यांना मंजुरी मिळणार आहे तर सात अर्ज सदर रुग्णालय पी एम केअर च्या पॅनल वर नसल्याने नामंजूर झाले आहे. सरकारी रुग्णालयास तातडीने मदत जमा होते तर खाजगी रुग्णालयात जसे बिले सादर होतील तसें अदा केले जाते तर जर रुग्णाने पूर्ण बिल अदा केले असेल अन रुग्णालयाने बाकी नसल्याचा दाखला दिल्यास सदर रक्कम रुग्णाचे खाती जमा होते त्यास तीन वर्षाची मुदत आहे तरी ज्या गरजू रुग्णांनी अर्ज केले होते त्यांनी सदर रक्कम मिळाल्याची खात्री करून घ्यावी.नाशिक जिल्ह्यात सह्याद्री हॉस्पिटल, मानवता केअर, नामको हॉस्पिटल इंदोरवाला हॉस्पिटल हे पॅनल वरील हॉस्पिटल असून गरजूनी याचा विचार करून आवश्यक कागदपत्र जमा करत पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले आहे.