दिंडोरी -दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी (15 व्या वित्त आयोगातून) 42 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार भास्कर भगरे यांनी दिली.
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी खा. भास्कर भगरे यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून याकामी सर्वच लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी (15 व्या वित्त आयोगातून) 42 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संघासाठी 5 कोटी 24 लाख रुपये, कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघासाठी 4 कोटी 2 लाख रुपये, मालेगाव - नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी 15 कोटी 61 लाख रुपये, देवळा-चांदवड विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटी 83 लाख रुपये, निफाड विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटी 83 लाख रुपये, येवला विधानसभा मतदार संघासाठी 12 कोटी 94 लाख रुपये असा एकुण 42 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. खासदार भास्कर भगरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेंने त्यांचे आभार मानले आहे.