महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा

मुख्य संपादक l मनोज पाटील
दिंडोरी l दि.21 
क्रिशा फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तसेच भव्य करिअर मार्गदर्शन सेमिनार रविवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता दिंडोरी येथील सांस्कृतिक भवन शेजारी, दिंडोरी ट्रेड सेंटर, शिवाजीनगर येथे आयोेजित करण्यात आल्याची माहिती आयोजक प्रा. उज्वला कोथळे - उगले यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन, विशेष साय्यय मंत्री ना. नरहरी झिरवाळ आणि माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील अनेक आदर्श व कर्तुत्ववान शिक्षकांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना यामध्ये गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर भव्य करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील प्रसिध्द शैक्षणिक कौशल्य प्रा. समिर इनपुरे तसेच प्रा. अक्षय गौड हे मार्गदर्शन करणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी भविष्यातील मुलांच्या करिअरचा संधी जाणून घेण्यासाठी हे मार्गदर्शन चुकवू नये, असे आवाहन आयंोजक तसेच क्रिशा फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. उज्वला कोथळे - उगले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने