महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव यात्रा बाबत आढावा बैठक संपन्न

नांदुरी प्रतिनीधी l किरण आहिरे
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवात भाविकांची सुरक्षितता, आरोग्य व वाहतूक याला प्रशासनाने विशेष प्राधान्य दिले आहे.भाविकांसाठी यात्रा कालावधीत ट्रस्टतर्फे मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे 
दोन एप्रिल पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या , याबाबत बुधवारी (ता. १९)
अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, व उपविभागीय अधिकारी अकनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली असून, केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. 
सप्तशृंगगडावर 5 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान चैत्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात बुधवारी सप्तशृंगगड येथे सप्तशृंगीदेवी ट्रस्टच्या कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस पोलिस अधीक्षक , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, , सहाय्यक पोलिस अधिकारी , तहसीलदार रोहिदास वारुळे , गटविकास अधिकारी, आदी उपस्थित होते. बैठकीत तसेच प्रत्यक्ष मंदिर व पहिली पायरी परिसरात फेरफटका मारत प्रशासनास आदेश देण्यात आले. यात प्रामुख्याने आरोग्ययंत्रणेने गडावरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ट्रस्ट दवाखाना, रामटप्पा आदी ठिकाणांबरोबरच बसस्थानक पायरस्ता, रडतोंडी या भागातही पायवाटेने येणाऱ्या भाविकांसाठी उपचार केंद्र उभारण्याच्या सूचना देत दोन अतिरक्त रुग्णवाहिकांसह दहा रुग्णवाहिका तैनात करण्याच्या सूचना दिल्या. पिण्याच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या. नांदुरी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावरील साईडपट्ट्या व खड्यांची डागडुजी करून रस्त्याला रिफ्लेक्टर व ठिकठिकाणी सूचना व मार्गदर्शक फलक लावणे तसेच या मार्गावर, दोन जेसीबी व क्रेन तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. एसटी महामंडळाने भाविक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी नवीन गाड्या वापराव्यात, तसेच नांदुरी व गडावरील बसस्थानकाच्या वाहनतळावर नियंत्रण कक्ष, फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागीय वाहतूक नियत्रंकांना करण्यात आली आहे.
 प्लॅस्टिक बंदीचाही सूर आळवत पाणी शुद्धीकरण करूनच वापरात आणण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला व देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापनाला सुचना देण्यात आल्या . गड ग्रामपंचायत हद्दीत यात्रोत्सवात होणारी अतिक्रमणे काढून टाकावीत अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत दिले. पहिल्या पायरीजवळील वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत जनित्राला सुरक्षित जाळी बसविण्यात यावी. गावातील खड्डे बुजविण्यासाठी कच, खडीचा वापर करावा, अशा सूचना ग्रामपंचायतीला देत प्लॅस्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याबाबत कारवाई करण्याचा कडक आदेश सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला देण्यात आला. फनिक्युलर ट्रॉली व पायरी वाटेने येणाऱ्या भाविकांमध्ये योग्य प्रमाणात समन्वय साधत पोलिस व ट्रस्ट प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने दर्शन सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील राहावे याबाबतही या बैठकीत संबंधित विभागाला आदेश दिला आहे. वीज वितरण कंपनीने धोकादायक वीजखांब, धोकेदायक झाडांच्या फांद्या,व वाहिन्यांची पाहणी करून बदल्यानबाबत कार्यवाही करावी व २४ तास वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना केली. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने सर्व हॉटले व दुकानांची तपासणी करून कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. ट्रस्ट व ग्रामपंचायतीने गडावर ठिकठिकाणी भाविकांची कुचंबना होऊ नये यासाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी देवस्थान ट्रस्ट अधिकारी व कर्मचारी मंडळ अधिकारी विलास पगार तलाठी महेश वाघ पहिली पायरी कार्यालयप्रमुख सरपंच रमेश पवार संदीप बेनके 
नांदुरी सरपंच प्रकाश राऊत ग्रामपंचायत सदस्य सुभाष राऊत, विवेक बेनके , प्रकाश कडवे, ट्रस्ट अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, रोप-वे कर्मचारी, आदींसह ग्रामस्थ, सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने