महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भाऊसाहेब चव्हाणके यांची निवड

 मुख्य संपादक l मनोज पाटील 
दिंडोरी । जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास सदस्यांची राळेगणसिद्धी येथे बैठक झाली. या बैठकीत दिंडोरी तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब चव्हाणके यांची निवड करण्यात आली. बैठकीत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी स्थानिक नागरिकांना संघटित करून लोक आंदोलन उभे करावे, अशी सूचना अण्णा हजारे यांनी केली. या आंदोलनाकरिता नेमकी कशी व कोणती तयारी करावी, या बद्धल सुचना, रूपरेषा आदीबाबत मार्गदर्शन अण्णा हजारे यांनी केले. नाशिक जिल्हयासोबतच दिंडोरी तालुका संघटना बांधणीसाठी देखील त्यांनी सूचना केल्या. नाशिक जिल्हा व दिंडोरी तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना तसे पत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, अध्यक्ष कल्पनाताई इनामदार, कार्याध्यक्ष दत्ता आवारी, विश्वस्त अन्सार शेख, कार्यालयीन व्यवस्थापक विकास गाजरे, निशिकांत पगारे यांच्या हस्ते दिंडोरी तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब चव्हाणके यांची निवड करण्यात आली..यावेळी रवींद्र कदम, सोमनाथ कदम, विष्णू कदम, श्रीराम कळमकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने