महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अपघातात करंजवण येथील बर्डे दांपत्य ठार करंजवण गावावर शोककळा

मुख्य संपादक l मनोज पाटील                                       
दिंडोरीतालुक्यातील दिंडोरी वणी रस्त्यावरील वलखेड फाटा येथे झालेल्या आयशर व कार अपघातामध्ये करंजवण येथील पती -पत्नी जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाले आहे. जखमी मुलीला तातडीने खाजगी रुग्णालयात करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. 
 तालुक्यातील वलखेड फाटा येथील वजन काट्यासमोर कार क्रमांक एमएच ०१ बी वाय ०६९१ व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांंक एमएच ०५ एफ.जे ८१८८ यांच्यात भीषण अपघात झाला. यावेळी करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे (४३) पत्नी सुरेखा सतीश बर्डे (४०) व मुलगी समृध्दी सतीश बर्डे (१७) हे तिघे कारव्दारे निळवंडी येथून नातेवाईकाकडून आपल्या करंजवण गावी परतत असतांना सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अपघात होऊन तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती -पत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मुलगी समृध्दी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश देशमुख करीत आहे.                                                                                 
करंजवण येथे स्वयंस्फूर्तीने बंद
करंजवण येथे सतीश बर्डे दांपत्य अपघातात मृत्यू झाल्याने मंगळवारी ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने बंद ठेवत आपले दैनदिन व्यवहार बंद केले. शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने