माणी । दि. 25 वार्ताहर
सुरगाणा वन परीक्षेत्रातील नियतक्षेत्र माणी अंतर्गत वडमाळ डोंगराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले आहे.
काल सकाळीअकरा वाजेदम्यान वडमाळ डोंगराला अचानक आग लागली. वणवा आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासांनी यश आले. सुरगाणा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना याबाबत माहिती समजतात त्यांनी तात्काळ याची दखल घेत वन मजूर वनपालाना घटनास्थळी दाखल झाले. सुरगाणा नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि उपस्थित वन कर्मचारी सावित्री राठोड, तुकाराम चौधरी, भास्कर खांडवी, बेबी कामडी, मनिषा गायकवाड व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासात आटोक्यात आणली. या घटनेत जवळपास तीन हेक्टरमध्ये असलेल्या गवत पेटल्याने हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. त्याचप्रमाणे अनेक वनजीवांचा जीव गमवावा लागला असल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.