महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कोहोर गटात उबाठा गटाला धक्का "नंदुभाऊ गवळी यांचा भाजपात प्रवेश"

कोहोर | वार्ताहर 
          पेठ तालुक्यात उबाठा गटातील शिवसेना पक्षाला खिंडार पडून कोहोर गटातील महाआघाडी गटाचे विधानसभा प्रमुख नंदूभाऊ गवळी यांच्या गट, गणातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
         मुंबई येथे दि.२५ रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालयात नाट्यमय घडामोडी नंतर गेल्या दोन महिन्यापासुन श्रेयवादाच्या भोवऱ्यात रखडलेला पक्षप्रवेशावर अखेर पडदा पडला. 
       भारतीय जनता पार्टीचे 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी कुंटुंब व कल्याण आरोग्य राज्य मंत्री भारती ताई पवार,डॉ. प्रशांत बदाणे , सुनील बच्छाव, 
व प्रमुख कार्यकारिणीच्या उपस्थिती मध्ये आणि माजी खासदार भारती ताईं यांच्या नेतृत्वामध्ये महाआघाडी गटाचे विधान सभा प्रमुख व उबाठा कोहोर गटाचे प्रमुख 
 नंदुभाऊ गवळी यांच्यासह व कोहोर गटातील तसेच पेठ तालुक्यातील विविध प्रमुख पदाधिकारी व गट प्रमुख , गण प्रमुख आजी, माजी सरपंच, उपसरपंच , ग्राम पंचायत सदस्य , विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते दिलीप चौधरी, रघुनाथ गवळी, शशीकांत भुसारे, नितीन गायकवाड, शशिकांत गावंढे, मधुकर गुंबाडे , प्रविण पोटिंदे, रामदास चारोस्कर व कोहोर गटातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला.
        नंदुभाऊ गवळी यांच्या पक्ष प्रवेशाने गेल्या पंधरा वर्षांपासून एकहाती ताब्यात असलेला कोहोर गटामध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याने राजकीय नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने