सुरगाणा तालुक्यातील भरडमाळ येथील शेतकरी काशीनाथ चिंतामण गाढवे यांच्या शेतात असलेल्या घरातून बुधवारी (दि.२६) रोजी पहाटे साडेपाच वाजता बिबट्या च्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाल्याची घटना घडली आहे. घटना समजताच घटना स्थळी सुरगाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी धाव घेत घटना स्थळांचा पंचनामा करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे रविवारी (दि.२३) रोजी रोकडपाडा येथे बिबट्या च्या हल्ल्यात पाच शेळ्या फस्त केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील भरडमाळ येथे काशीनाथ गाढवे यांच्या मालकीचे दोन वासरे ठार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
"रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवणे उजेडाची व्यवस्था करणे आणि सोमवार फिरणे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. "
- विजय वेलकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरगाणा
वनविभागाच्या वतीने बिबट्या च्या हालचाली चा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसवणे आणि पिंजऱ्याची व्यवस्था करणे. अशी मागणी करण्यात आली आहे.