महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आदिवासीच्या १७५ जागांसाठी ९ एप्रिलला परीक्षा

संपादक l कृष्णा पवार 
नाशिक, (प्रतिनिधी.) 
            आदिवासी विकास विभागाकडून आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून १७ संवर्गातील ६११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंर्तगत १७५ जागांसाठी येत्या ९ एप्रिलला लेखी परीक्षा पार पडणार आहे. या पदावर गृहपालपदाच्या ९१ (पुरुष-६२, महिला- २९) तर अधीक्षक ८४ (पुरुष- २९, महिला- ५५) जागांचा समावेश आहे. उर्वरित पदांच्या लेखी परीक्षा आगामी काळात टप्या-टप्याने घेण्याचे नियोजन सुरु आहे. आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार १७ संवर्गातील ६११ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल-स्त्री, गृहपाल पुरुष, अधिक्षक स्त्री, अधिक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आदी पदांचा समावेश आहे. गृहपाल-स्त्री, गृहपाल पुरुष, अधिक्षक-स्त्री, अधिक्षक पुरुष पदाच्या लेखी परीक्षेचे हॉलतिकीट पात्र व इच्छुक उमेदवारांना https://tribal.maha-rashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून लवकरच डाउनलोड करण्यात येणार आहे. परीक्षेच्या अपडेट माहितीसाठी संकेतस्थळाला वारंवार भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने