महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पेठ तालुक्यातील खिरोणापाड्यात वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून ५१ फिरत्या जलचक्रीचे वाटप

बाऱ्हेl प्रतिनीधी - (ता.२८)
पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोल्हारमाळ पैकी खिरोणापाडा येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून ५१ फिरत्या जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले. 
         फिरत्या जलचक्रीचा वाटप कार्यक्रम करण्यासाठी याआधीच खिरोणापाडा गावात वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती. सर्व वस्तीला एकत्र करुन गावाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. गावाची पाहणी करुन गावाला जलचक्रीचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. जलचक्री वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये, गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी म्हणून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेच्या माध्यमातून खिरोणापाडा येथे फिरत्या जलचक्रीचे वाटप करण्यात आले. वाटपावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मितहास्य होते, महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, रोशन भांगरे, रंजीत कारके, जलपरिषद मित्र वनपाल नवनाथ गांगोडे, नामदेव पाडवी आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. गावातील सर्व महिला वर्गाने उत्तम नियोजन करत सहभाग घेतला.

--
या अगोदर दुरवर जाऊन, भटकंती करत डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी जात होते त्यामुळे आमच्या गावात महिलांना कंबरदुखी, गुडघेदुखी, मणक्याचा त्रास आदीसह आजारांचा सामना करावा लागत होता. परंतु या संस्थेने आमच्या गावात येऊन परिस्थिती बघून आम्हाला फिरत्या जलचक्री देऊन मदत केल्याने आम्ही सर्व गावातील महिला वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे आभार मानतो.
- सुमित्रा मोकाशी, खिरोणापाडा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने