दिंडोरी । दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवार दिंडोरी येथे उद्या रविवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 10.15 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कांदा या शेतीमालाचे जाहीर लिलाव पद्धतीने खरेदी विक्री व्यवहार सुरु करण्यात येणार आहे. सदरचा कांदा लिलाव शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपला कांदा दिंडोरी मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, सचिव जे. के. जाधव व संचालक मंडळाने केले आहे.
उद्या कांदा लिलावाचा शुभारंभ
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0