महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रुईपेठा ग्रामपंचायतीला "आर आर (आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्कार जाहीर.

पुनदखोरे- प्रतिनीधी 
नाशिक जिल्हयातील पेठ तालुक्यामधील रुईपेठा या ग्रामपंचायतीला शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या "आर आर (आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जाहीर केले आहे. दहा लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०२३-२४ या वर्षाचा पुरस्कार रुईपेठा या गावाला प्राप्त झाला आहे. पेठ तालुक्यातिल ८०२ लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत आहे. 
      पेठ तालुक्यामधून निवड झालेल्या 15 ग्रामपंचायतीस स्मार्ट पुरस्कार शासनाने जाहीर केला. प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. तालुक्यातून स्मार्ट ग्रामसाठी तीन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रूईपेठा ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवत तालुका स्मार्ट गाव आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पटकावला. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी हा पुरस्कार जाहीर केला.सदर पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्यासह पेठ तालुक्यातून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदिवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया.. विनायक पुंडलिक भोये (सरपंच ) रुईपेठा ग्रामपंचायत..
 आमच्या गावाला सदर पुरस्कार मिळवून देण्यासाठी माझ्या गावचे सर्व ग्रामस्थ, बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्य तसेच पोलीस पाटील भास्कर भिवसन, उपसरपंच पंडित भोये, सदस्य हिरा भोये, हिरा बोरसे, श्याम जाधव, प्रकाश गायकवाड, रंजना गावित तंटामुक्त अध्यक्ष चिमणा भिवसन, शिपाई सुनील खोटरे आम्ही सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून परिश्रम घेतले. आम्हाला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी सोबत राहून मार्गदर्शन करणारे ग्रामसेवक गौतम चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष सूर्यवंशी यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करून प्रत्यक्ष आमच्याकडून कार्य करून घेतले म्हणून आम्ही या पुरस्कारासाठी पात्र झालो 
फोटो.. सरपंच विनायक भोये

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने