वणी l वार्ताहार :- वणी - कळवण रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला एका दुचाकीने धडक दिल्याने त्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, काल रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास एक लाल रंगाची बुलेट मोटार सायकल ही वणी बाजूकडून कळवण बाजूकडे जात असतांना रोडच्या कडेला पायी जाणारी दिंडी पाहत उभी असलेली महिला सुमन सुनिल लाहोर( वय ५२ रा. खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक हल्ली रा. शेटे मळा, कळवण रोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांना धडक दिली. त्यात त्यांच्या कपाळास, दोन्ही हातास, पायास गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास वणी पोलीस करीत आहे. याबाबतची फिर्याद वणी पोलीस ठाण्यात रोहीत सुनील लाहोर यांनी दिली आहे.