महाराष्ट्र ट्रायबल न्युज

निळवंडीला यात्रोत्सवनिमित्तउद्या विविध कार्यक्रम

 निळवंडीदि. 30 वार्ताहर
 निळवंडी येथे सोमवार दि. 31 रोजी हनुमान यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
निळवंडी व परिसरातील भाविकांचे हनुमान हे आराध्या दैवत आहे. वर्षभरात हनुमानाची विविध उपक्रम राबवून पुजाअर्चा केली जाते. यात्रेनिमित्त मारुती मंदिराभोवती विद्युत रोषणाई, पताका लावण्यात आल्या आहे. यात्रेमध्ये खाद्य पदार्थांची दुकाने, खेळण्यांची दुकाने, मिठाई दुकाने, पाळणे आदी दुकाने थाटणार आहे. या निमित्ताने निळवंडी येथील युवक नाशिक रामकुंडावरुन कावडीव्दारे निळवंडी येथे पायपीट करुन तिर्थ घेऊन येतात. त्यांची गावाच्या वेशीपासून वाजत - गाजत मिरवणूक काढली जाते. मारुती मुर्तीला जलभिषेक व महापूजा, नवसपुर्ती केली जाते. रात्री कलावतांचा तमाशा, देवीचे गाणे जागरण, वाघ्या मुरलीचे गाणे व विविध देवतांची मिरवणूक आदी कार्यक्रम होणार असून यात्रेच्या दुसर्‍या दिवशी हजेरी लावणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने