महाराष्ट्र ट्रायबल न्युज

खिरोणापाड्यात पाणी टंचाईच्या झळा प्यावे लागते तलावाचे दूषित पाणी


खोकरविहीर : देविदास कामडी 
पेठ तालुक्यातील खिरोणापाडा ग्रामपंचायत डोल्हाळ माळ असून गावाची लोकसंख्या 225 च्या आसपास असून खिरोणापाडा पाणी टंचाई मुळे महिलांना कसरत करावी लागत आहे. पाणी समस्या दूर व्हावी म्हणून गावकरी यांनी उंबूरणा विहीरीतुन गावाला पाणी पोहचवण्यासाठी प्रत्येक कुटुंब 100 रु वर्गणी जमा करून डिझेल मशीन द्वारे पाझर तलावातील दूषित पाणी गावातील विहिरीत टाकले की महिलांना पायपीट कधी थांबेल यांचे कोडे उलगडेना.परंतू महिलांना एक दिवसाची पायपीट नसून मार्च महिना आला की ही पायपीट दरवर्षी प्रमाणे सुरूच आहे. महिलांना यापासून सुटका मिळावी, पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून सतत ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करूनही गावाची तहान पाणी पुरवठा विभाग लक्ष देईना. जस जसा उन्हाचा ताप वाढत आहे तस तसा गावाचा गावातील महिलांनच्या डोक्यावरील उष्ण ताप वाढण्यास सुरवात होत आहे. डोल्हारमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारा खिरोणापाडा सारखे अनेक पाडे ग्रामपंचायत अंतर्गत येत असतात ग्रामपंचायत ला पाणी सुविधा करण्यात येते परंतू अशा ग्रामपंचायत मधील पाडे, वाड्या पाणी टंचाई ग्रस्त बघावयास मिळतात छोट्या पाड्याची दुर्दशा कुणीही सोडविण्यासाठी काम करताना दिसत नाही. आदीवासी भागात असे लहान पाडे टंचाई ग्रस्त असून याकडे शासन स्तरावर लक्ष देणे आवश्यक आहे. अशा छोट्याश्या पाड्यात विकासाकामाकडे लक्ष कमी प्रमाण बघावंयास मिळते. महसूली गाव नसल्याने निधी अभावी काम केले जात नाही. शासनाची जलजीवन मिशन योजना खिरोनापाड्यात नाही गावात पाईप लाईन असून तलावाचे पाणी विहीरीत टाकावे लागत आहे. शासन दमणगंगा नदीचे पाणी पूर्व भागाला सुजलाम सुपलाम करण्याचे ध्येय बाळगून आहे परंतू स्थानिक गाव पाड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या पाचवीला पूजली असून स्थानिक गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी नाही ह्या समस्या आहेत ह्या समस्या तशाच ठेवून पाणी पळवून नेण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. डोल्हारमाळ परिसरातील सर्व गावाचे म्हणणे आहे की प्रथम आमच्या गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी किती लागेल याचा सर्व्हे करावा आमची शेती, विहिरी यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या ठोस सुविधा, उपाय योजना द्याव्यात नंतर इतरांचा विचार करावा याबाबतीत परिसरातील सरपंच, ग्रामस्थ यांची मागणी आहे. जलजीवन योजना काही गावांना सुरुवात करून मठ्या निधीने सुरवात झाली परुंतू गावाची तहान भागवन्यात योजना कुचकामी ठरली आहे. अशा गावांना दरवर्षी टँकर द्वारे पाणी पुरवठावर वारेमाफ खर्च करण्यात येतो परंतु गावाला तहान मुक्त करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.खिरोणापाडा गावात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी प्रतेकी घरामागे एकुण 100रु वर्गनी करूण डीझल मशीन द्वावारे पाणी पाझर तलावातील दूषित पाणी विहीरी मध्ये टाकले जाते यामुळे गावाला आजाराला सामोरे जावे लागत आहे. लहान लहान मुली आणि महीला विहीरीवर पाणी भरायला जातात गावा पासुन विहीर 500 मीटर असुन महीला रात्री बेरात्री विहीरीवर पाणी भरण्यासाठी जंगलात जातात यामुळे जंगली जनावराची भीती असुन सुद्धा नाईलाजाने पाणी भरण्यासाठी जावे लागते यावेळी काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदारी कोण घेणार आहे यासाठी खिरोणापाडा सारखे अनेक गाव पाडे यांचा शासन स्तरावर विचार व्हावा आणि अशा गावांना पाणी समस्या दूर करण्यासाठी ठोश उपायोजना आखाव्यात अशी खंडू दिवे, माधव रिझंड, जगन खेत्री, उत्तम काकवे, योगेश काकवे, वसंत दोडके, पंडित सापटे, वसंत दोडके, हेमराज सापटे, युवराज सापटे, आशिष सापटे, भरत रिंझंड, पांडुरंग दोडके,ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने