ओझे l वार्ताहर
कर्मयोगी कै. एकनाथ भाऊ जयराम जाधव यांच्या 12 व्या पुण्यस्मरणानिमित्त 17 ते 19 मार्च या तीन दिवशी विविध कार्यक्रम सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव सभागृह मोहाडी येथे होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी दिली.
सोमवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता पुण्यस्मरण व जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा उदघाटन होणार आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस अड.नितीन ठाकरे असतील.प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी बी मोगल, चिटणीस दिलीप दळवी, सह्याद्री फार्म चे अध्यक्ष विलास शिंदे व मविप्र समाज संस्थेचे सर्व संचालक,शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
मंगळवार दिनांक १८ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता प्रसिद्ध व्याख्याते व किर्तनकार अविनाश भारती यांचे बाप समजून घेतांना या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र चे माजी संचालक संपतराव घडवजे असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धनराज महाले,असतील.बुधवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते व कवी प्रा.लक्ष्मण महाडिक व प्रा.संदीप जगताप यांचे विचार व कवितांचा लाभ मिळणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जेष्ठ नेते सुरेश डोखळे असतील.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील,अवनखेड चे सरपंच नरेंद्र जाधव उपस्थित राहणार आहे.
या तीनही दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आव्हाहन कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक मविप्र संचालक तथा माजी जिल्हा परिषद गटनेता प्रवीण एकनाथ जाधव, संयोजक मविप्र शिक्षणाधिकारी तथा कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ विलास देशमुख, सरपंच सौ आशा लहागे,उपसरपंच सौ भाग्यश्री जाधव, मोहाडी सोसायटी चे अध्यक्ष प्रा.कैलास कळमकर,उपाध्यक्ष उमेश जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, शालेय समिती अध्यक्ष व्ही जे जाधव, सुरेश सोमवंशी, रामराव जाधव,रविंद्र जाधव,मुख्याध्यापक सौ शरयू भामरे,सौ सोनाली देशमुख, प्राचार्य श्रीमती माया वारूगसे,मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी, सौ नीलम घुले, उत्तमराव जयराम जाधव, प्रदीप एकनाथ जाधव व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी केले आहे.