खिर्डी ग्रामपंचायत पैकी मौजे कहांडोळपाडा येथील श्री.वामन गणपत वार्डे रा. कहांडोळपाडा ता सुरगाणा जि नाशिक यांच्या घराला सकाळी ११.०० च्या दरम्यान घरात कुणीही नसताना अचानक घराला आग लागली असून घरचे पूर्ण वासे व मंगलोरी कौले तसेच घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू व साहित्ये घरातील कागदपत्रे,व धान्य पंचवीस पोते भात,नागली ,तुरी ,उडीद,कुळीद,तसेच ट्रक्टरचा हप्ता भरण्यासाठी लोकांकडून उसने पैसे घेऊन जमा करून ठेवलेली रोख रक्कम तीन लाख रुपये सोन्याचे मंगळसूत्र दोन व बाजीबंद व चांदीचे दागिने पूर्णपणे जळून खाक झाले आहे. असे एकूण नऊ ते दहा लाखाहून अधिक खूप मोठे नुकसान झालेअसे सरपंच वळवी यांनी सांगितले. त्या लाभार्थ्याला आज रोजी राहण्यासाठी निवारा खाण्यापिण्या साठी त्यांच्याकडे काही शिलक्क उरलेले नाही तरीही हया झालेल्या नुकसानीचे वस्तुस्थितीची जागेवर जाऊन पाहणी करण्यासाठी खिर्डी ग्रामपंचातीचे सरपंच श्री. शिवराम बोवाजी वळवी व ग्रामपंचायात कर्मचारी श्री.कासू हिरामण धनगर श्री.राजेश हिरामण भोये श्री.देविदास काशिराम कोहकिरे तसेच गावातील ग्रामस्त रामदास सोमा वार्डे यांनी घटनास्थळी प्रत्येक्ष जाऊन पाहणी केली असता १०० टक्के पूर्णपणे घरची नुकसान झालेली आहे.आज रोजी ते कुटुंब उघड्यावर पडलेले असून त्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.तरही या लाभार्थ्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरपंच खिर्डी ग्रापंचायत यांनी महसूल विभागाकडे मागणी केली आहे.
कहांडोळपाड्यात आगीने घराचे नुकसान
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0