महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार

मुख्य संपादक l मनोज पाटील
दिंडोरी । चिंचखेड येथे कादवा कामगार युनियनच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कादवा साखर कारखाना कामगार युनियनच्या निवडणुकीत विजयी उमेदवार कार्याध्यक्षपदी भगवान जाधव, उपाध्यक्षपदी कैलास शिंदे, खंडेराव कावळे, संपत भोज सरचिटणीसपदी अजित दवंगे, सहचिटणीसपदी कैलास उगले, सुरेश फुगट, खजिनदारपदी संतोष उशीर, सदस्यपदी अजय दवंगे, अमोल गटकळ, केशव पवार, कैलास बडदे, बापूराव शिंदे, बाळासाहेब गांगुर्डे, बाळासाहेब दुगजे, शिवाजी गांगोडे, ज्ञानेश्‍वर पगार सर्वं विजयी उमेदवारांचे चिंचखेड येथे ग्रामस्थांच्या वतीने शाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विठ्ठलराव संधान, निवृत्ती मातेरे, दत्तात्रय संधान, सोमनाथ मातेरे, योगेश पाटील, सोमनाथ संधान, कपिल पाटील, सदाशिव सोनवणे, गणेश पाटील, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन बापूसाहेब पाटील, संचालक भाऊसाहेब पाटील, प्रविण पाटील, शिवानंद संधान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने