महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शिवसेना पक्षाच्या वतीने दिंडोरी पोलीस ठाण्याला निवेदन

मुख्य संपादक l मनोज पाटील 
        महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या बद्दल कुणाल कामरा याने अवमान जनक टिप्पणी केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहे आणि म्हणूनच यापुढे कोणीही संविधानाचा गैरवापर किंवा असे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच नाशिक ग्रामीणच्या प्रत्येक तालुकास्तरावर पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार व निषेध करून निवेदन देण्यात आले. त्याच अनुषंगाने दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर लेखी तक्रार करून शिवसैनिकांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले. 
       यावेळी शिवसेना ज़िल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा प्रमुख अतुल वाघ, तालुकाप्रमुख किशोर कदम, दिंडोरी शहर प्रमुख सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, नगरसेवक प्रदीप घोरपडे, युवा सेना संघटक सनी घोरपडे, युवा शहर प्रमुख रोहित देशमुख, सोनू चौधरी, अमोल चौधरी, उदय मेदने, सागर भवर, संकेत निकम,वैभव पाटील,गौरव गायकवाड, भूषण जगताप, अमित कोरडे, अक्षय शिरसागर, निखिल सोनवणे, प्रदीप जाधव, कैलास राऊत, शुभम मोरे, सुमित साळुंखे, आकाश कराटे, योगेश घेतांडे,सौरभ झोपाळे, अफताफ खान, ओंकार घाणे, सिद्धार्थ मेधाने, यश धोबडी, नितीन कापसे,श्रेयस मेधणे, ऋषिकेश धामोरे,चैतन्य कडाळे, शिवम गवारे, सुमित धेनक,सार्थक वाघ,हर्षद शिंदे,अ भय पवार,रोहन साठे,रोहित गायकवाड,अविनाश पगार,आकाश जाधव,अनिकेत खरे, सुरज शिंदे,उदय बोके,विकास हाडस आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने