महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सप्तशृंगी गडावरील अतीक्रमण जमीनदोस्त

निवाने (वसंत आहेर) :
       श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर वनविभागाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणांविरोधात कळवणच्या वनपरिक्षेत्र अधिकारींनी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविली असून अतिक्रमित जागेत लोखंडी ॲंगल व ऊभे करण्यात आले आहे.
          सप्तश्रृंगी गडावरील जवळपास ९८ टक्के क्षेत्र (३७४ हेक्टर) वनविभागाच्या कक्षेत येत असून अवघी ९ हेक्टर जागा ही सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतींअंतर्गत येते. यात सप्तश्रृंगीगड गाव वसलेले असून गावाची लोकसंख्या साडेतीन हजाराच्यावर आहेत गडावर वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने गडावर वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच. भावीकांना शिवीगाळ, व मारहाण होण्याबरोबरच यात्रोत्सव काळात भाविकांना पायी चालणेही मुश्कील होते. सप्तशृंगीगडावर. सहाय्यक जिल्हाधिकारी मालेगांव देवदत्त केकान साहेब कळवणचे उपविभागीय अधिकारी अकनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली १९ मार्चला आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुख तसेच सप्तशृंगीगड व नांदुरी ग्रामपंचायत, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, व्यापारी प्रतिनिधी यांच्यासह घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायत व वन विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
            यावेळी वनविभागातर्फे पंधरा दिवसांत अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांनी सांगितले होते त्यानुसार मंगळवारी (ता.२५ ) रोपवेच्या प्रवेशद्वारालगतच असलेले अतिक्रमण उपवनसंरक्षक, पूर्वभाग नाशिक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक पूर्वभाग सोनवणे साहेब, यांच्या उपस्थितीत कळवणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती दीपावली गायकवाड यांनी देवळा, दिंडोरी, कळवणचा स्टाफ बोलावुन मोहीम राबवली.
         काढलेल्या अतिक्रमित जागेत जेसीबीच्या साहाय्याने चारी पाडून त्या चारीत आठ फुटाचे लोखंडी ॲंगल गाडुन जाळी मारण्यात येणार आहे, तसेच मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत वनपाल धनराज बागुल ,शशिकांत वाघ, योगीराज निकम, वनरक्षक नाना राठोड, गोविंद वाघ, श्रीमती सुवर्णा भोये, श्रीमती सुनीता कोल्हे ,खडकशींग पाल, वनसेवक अमृत पवार आदींनी सहभाग घेतला. अतिक्रमण निर्मुलन मोहिमेस ग्रामपंचायत सप्तशृंगगड, श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट, रोपेवे, ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी सहकार्य केले. व अभोणा पोलीसांचे विशेष मोलाचे सहकार्य यावेळी पाहण्यास मीळाले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने