महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत उद्या वार्षिक स्नेहसंमेलन

दिंडोरी - मनोज पाटील
क्रिशा फाऊंडेशन, नाशिक संचलित दिंडोरी येथील ज्ञानज्योती क्लासेस व किड्स टाऊन प्रायमरी स्कूलच्या वतीने शुक्रवार दिनांक 28 रोजी सायंकाळी ५.३० वाजता
किड्स टाऊन प्रायमरी स्कूल, वलखेड फाटा, दिंडोरी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा संचालिका प्रा. उज्वला कोथळे-उगले, ज्ञानज्योती क्लासेस चे व्यवस्थापक श्री. जगदीश साळुंखे तसेच किड्स टाउनच्या मुख्याध्यापिका शर्मिष्ठा जोशी यांनी दिली. 
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांचा गुणगौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांच्या या कौतुक सोहळ्या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने