महाराष्ट्र ट्रायबल न्युज

विशाल चौधरींचा सत्कार

दिंडोरी । दिंडोरी येथील अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाचा विद्यार्थी विशाल चौधरी याने वाचनालयात अभ्यास करुन केंद्र सरकारची केंद्रीय गृह मंत्रालयाची स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण केले असून त्याची नियुक्ती क्लास टू अधिकारी पदी झाली आहे. विशाल चौधरी याने दोन वर्षांपुर्वी वाचनालयात अभ्यास सुरु केला. त्याची नुकतीच तलाठीपदी निवड होवून तो देवळा येथे कामही केले. तसेच त्याने अभ्यासही सुरु ठेवला. त्याने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाची परिक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला. त्याचा अरुणोद्य सार्वजनिक वाचालयाच्या वतीने संचालक तथा दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेयवक नितीन गांगुर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे सभासद, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विशाल चौधरी याने वाचनालयाचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने