आपणांस भविष्यात काय करायचं आहे, कोणत्या क्षेत्राकडे करिअर करायचे आहे यासाठी मार्ग निश्चित केला पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी होऊ असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.
किशा फाउंडेशन संचलित ज्ञानज्योती क्लासेस क्रिशा टेक्नो हब आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार तसेच भव्य करिअर गाईडन्स सेमिनार याचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण नाना जाधव बोलत होते.
या प्रसंगी मविप्र समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव ,अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे,काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनील भाऊ आव्हाड,कृ.उ.बा. समिती दिंडोरी उपसभापती योगेश बर्डे , भाजपा तालुका अध्यक्ष शाम भाऊ मुरकुटे, माजी सैनिक संघटनेचे सदस्य राजाराम देशमुख, हिरामण पिंगळ,गणपत जाधव, उत्तम बुनगे, जनता इंग्लिश स्कूलचे पाचार्य शरद शेजवळ,आर के खांदवे, तुषार वाघ,भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करणारे समीर इनपुरे मा. अक्षर गौड यांनी करिअर गाईडन्स केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ उज्वला उगले यांनी केले.त्या म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इ.१०वी नंतर पुढे काय? तसेच 11 वी आणि 12 वी सायन्स, CET, JEE, NEET Classes साठी उत्कृष्ठ मार्गदर्शन उपलब्ध असल्याची माहिती दिली क्रिशा फाउंडेशनच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला
या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार देखील देण्यात आले. त्यामध्ये यशवंत उत्तमराव देशमुख,संतोष मनोहर कथार,तानाजी मुरलीधर जाधव श्रीमती.सविता शिवाजी गुंजाळ . वत्सला रावबा जाधव,श्रीमती. विशाखा दशरथ देवरे, श्रीमती. निर्मला जाधव मॅडम, श्रीमती संगीता मधुकर वाणी, संजय पोपट वाघ, शंकर हिरामण गायकवाड, दत्तात्रय गंगाधर वाणी, बाळासाहेब बाबुराव गांगुर्डे ,किरण राम गोपाल बैरागी, ईश्वर काशिनाथ राणे प्रा. सय्यद गुलनार अझीम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले त्याच पद्धतीने प्रत्येक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले
11 वी व 12 वी Science Class नवीन जागेत नवीन शाखा देखील घोषित करण्यात आली.
यावेळी कृउबा समितीचे उपसभापती योगेश बर्डे यांनीही मनोगत व्यक्त करून आपल्या जीवनातील घडामोडी बाबत माहिती दिली व यशस्वी होण्यासाठी अभ्यास किती महत्वाचा आहे याची माहिती दिली.
माजी सैनिक संघटनेच्या वतीने सौ उज्वला उगले कोथळे यांचा सन्मान
क्रिशा फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.उज्वला उगले (कोथळे)यांनी शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात कामकाज करत असताना मागील दोन वर्षांपासून सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी रक्षाबंधन ला 21 हजार रुपयांच्या राख्या बांधवांसाठी पाठवून उपक्रम राबविला त्याबद्दल माजी सैनिक संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या व माजी सैनिकांच्या हस्ते त्याना सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.