महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पासोडीपाडा गावाच्या रस्त्याची दुरवस्था – वाहनचालकांना मोठा त्रास

बोरगाव- प्रतिनीधी 
सुरगाणा तालुक्यातील पासोडीपाडा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले व दगडधोंडे उघडे पडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीमुळे हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. दैनंदिन वाहतूक करताना दुचाकीस्वार, चारचाकी वाहने आणि शेतकरी आपल्या मालवाहू वाहनांसह मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. वेळेवर डांबरीकरण न झाल्यास हा रस्ता आता अपघातांना आमंत्रण देत आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी अशी मागणी केली आहे की संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याच्या डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी मधुकर वाघमारे, हिरामण भुसारे, कमलाकर पवार, भास्कर गायकवाड आदी केली नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने