महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामपंचायत राशा टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी - बोरगाव 
 जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय व टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत गुण गौरव सोहळा नाशिक येथे पार पडला.
यावेळी जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. सुधारकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रविद्र चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते राशा ग्रामपंचायतला सिल्वर पुरस्काराने गौरवण्यात आले.
गुण गौरव सोहळा प्रसंगी महात्मा गांधी यांचा अर्धाकृती पुतळा व प्रमाण पत्र स्विकरतांना सरपंच सिताराम भोये, ग्रा.पं. अधिकारी मधुकर वाघेरे उपस्थित होते. 
याप्रसंगी उपस्थितांनी सर्व ग्रामपंचायती चे सदस्य तसेच ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने