नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्याचे पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतील प्रदूषण रोखत पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करण्याची मागणी खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत केली आहे.
संसदेत बोलताना भगरे यांनी गोदावरी नदीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील सांडपाणी असेल किंवा कंपन्यांचे दूषित पाणी यामुळे संपूर्ण नदीपात्र अत्यंत प्रदूषित झाली आहे चांदोरी सायखेडा नांदूर मधमेश्वर या भागामध्ये प्रचंड पाण्याचा घाण वास येऊन जनपर्णी मोठ्या प्रमाणात वाढून जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात मरण पावत आहे तरी यावरती ठोस उपाययोजना करण्यात यावी. त्याचबरोबर कुंभमेळा पावसाळ्याच्या काळात येत असल्यामुळे अतिवृष्टी गोदावरी नदीचा पूर चिखल वरती शाश्वत उपाययोजना कराव्यात. विविध रस्त्यातील पूल नाशिक त्र्यंबकेश्वर ला जोडणारे रस्ते पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात सिंहस्थाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी केली