सुरगाणा तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायत पैकी कहांडोळपाडा येथे तीन दिवसांपुर्वीघराला आग लागून संसार उपयोगी व इतर वस्तू जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याची दखल जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बार्हे यांनी त्या नुकसानग्रस्त कुटूंबियाना संसारपयोगी वस्तू स्वरूपात मदत केली आहे.
कहांडोळपाडा येथील येथील वामन गणपत वार्डे यांच्या घराला तीन दिवसांपुर्वी घरात कुणीही नसताना अचानक घराला आग लागली. घरासह संसार उपयोगी सर्व वस्तू, कागदपत्रे, धान्य, पैसे, सोन्याचे मंगळसूत्र, चांदी पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या लाभार्थ्याला आज रोजी राहण्यासाठी निवारा खाण्यापिण्यासाठी त्यांच्याकडे काही शिलक्क उरलेले नाही. त्यांना वस्तू स्वरूपात पुढील जगण्याचे साधन म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक हात मदतीचा म्हणून बार्हे येथील जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था व जनलक्ष्मी कॉम्प्युटर व माजी आयुक्त यशवंत मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने संसार उपयोगी भांडे सरपंच वाघमारे व जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव धुम, मनोहर जाधव, पांडुरंग धुम यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त शेतकरी वामन वार्डे यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे त्यांना थोड्याफार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यांनी मदत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.