महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ननाशी मंडळातील खातेदारांसाठी महसूल विभागामार्फत एकदिवसीय शिबीर

ननाशी - वार्ताहर
महसूल विभागच्या 100दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत ननाशी महसूल मंडळातील शेतकरी आणि खातेदारांसाठी 24? मार्च ते 28मार्च 2025 या कालावधीत तलाठी सजे निहाय एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात अज्ञान पालकत्व शेरा कमी करणे,वारस नोंद करणे,शेतकरी ओळखपत्र आदी कामे करून दिली जाणार आहेत.दरम्यान ननाशी महसूल मंडळातील तलाठी सजे निहाय शिबिराची दिनांक, वेळ आणि ठिकाण कळविण्यात आले आहे.त्यानुसार सोमवार 24 मार्चला सकाळी 11 ते 5 या वेळेत जोरण सजेतील जोरण,जोरणपाडा,श्रीरामनगर,ठेपणपाडा आदी गावातील शेतकऱ्यांसाठी दत्तमंदिर सागाईदेवी जोरणपाडा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ननाशी साहेतील ननाशी,धोंडाळपाडा,आंबाड,देवळीचापाडा,बाडगीचापाडा आदी गावातील शेतकऱ्यांसाठी मंगळवार 25 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मारुती मंदिर ननाशी येथे शिबीर होणार आहे.नळवाडी सजेतील नळवाडी,नळवाडपाडा,निगडोळ या गावांसाठी बुधवार 26 मार्च सकाळी 11 ते 5 या वेळेत मारुती मंदिर नळवाडपाडा येथे शिबीर घेतले जाईल.चारोसे सजेतील चारोसे,वणीखुर्द,पिंपळगाव धूम या गावातील शेतकऱ्यांनी गुरुवार 27 मार्च ला ग्राम पंचायत कार्यालय चारोसे येथे सकाळी 
11 ते 5 या वेळेत शिबिरासाठी उपस्थित राहावे.तर गांडोळे सजेतील गांडोळे,देहरे,मोखनळ,टेटमाळ,चिकाडी या गावातील शेतकऱ्यांसाठो शुक्रवार 28 मार्च सकाळी 11 ते 5 या वेळेत दत्त मंदिर चिकाडी येथे शिबीर होणार आहे.
दरम्यान सदर शिबिरात सहभागी होतांना शेतकरी आणि खातेदारांनी अज्ञान पालकत्व शेरा कमी करण्यासाठी सज्ञान असल्याचा वयाचा पुरावा,ओळखपत्र,अ.पा.क.शेरा कमी करण्याचा अर्ज,प्रतिज्ञापत्र,अ.पा.क.फेरफार नोंद आदी कागदपत्र सोबत आणावे.वारस नोंदीसाठी मयत खातेदाराचा मृत्यू दाखला,वारसाचे प्रतिज्ञापत्र,ओळखपत्र,वारस नोंद अर्ज,मयत खातेदाराच्या नावे झालेली फेरफार नोंद आदी कागदपत्र घेऊन यावे.तसेच शेतकरी ओळखपत्रासाठी सातबारा उतारा,आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आदी कागदपत्र सोबत आणावे असे आवाहन ननाशी मंडळ अधिकारी ए.पी.धमके आणि संबंधित सजेच्या तलाठ्यानी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने