महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मोहाडीत शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता


मोहाडी
ता.23 : प्रतिनिधी 
मोहाडी येथील प्राचीन अहिल्यादेवी होळकर बारवाजवळील श्री मोहेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात शिवकथाकार विजय महाराज आर्दड, बीड यांच्या वाणीतून रोज सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ दरम्यान होत असलेल्या शिवमहापुराण कथेची शनिवारी (ता. 22) मोठ्या जल्लोषात सांगता झाली. यामध्ये शिव महात्म्य आणि चंचुला उपाख्यान, शिवलिंग उत्पत्ती, रुद्राक्ष भस्म,विश्वमोहिनी,शिव पार्वती विवाह,शिव अवतार,बाणासूर, कार्तिक स्वामी -गणेश जन्म, महाशिवरात्री व्रत कथा अश्या विविध कथांच निरूपण केले.महाआरती झाली.याप्रसंगी खासदार भास्कर भगरे, युवानेते गोकुळ झिरवाळ उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.डॉ. योगेश देशमुख, अतुल देशमुख, रवींद्र देशमुख यांच्यातर्फे महाप्रसाद झाला.कथा कालावधीत सुभाष महाराज बीडकर तबला वादन, साहेबराव महाराज कवडेकर सिंथ वादन,साईनाथ महाराज नांदेडकर गायन तर अशोक जाधव टाळाची साथ दिली.कथे दरम्यान पंचक्रोशी तील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहेश्वर मित्र मंडळाचे शहाजी सोमवंशी, प्रवीण पाटील, दिलीप सोमवंशी,नंदू पाटील,योगेश देशमुख, श्रीराम जाधव,लक्ष्मण देशमुख, सुधाकर सोमवंशी,ललित सोमवंशी सह ग्रामस्थ प्रयत्नशील होते.
मोहाडी: शिव पार्वती विवाह कथेचे निरूपण करताना विजय महाराज आर्दड.समवेत विवाहाचा सजीव देखावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने