महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित महाराष्ट्रातील विविध भागातील कला, संस्कृती एकाच मंचावर शाहूनगरीत गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब खासबाग मैदान कोल्हापूर येथे विधिनाट्य महोत्सवाचे करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, पालघर वाडा येथील आदिवासी कला, संस्कृती अभ्यासक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २५ ते २६ मार्च तीन दिवसीय राज्य स्तरिय कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील श्रीभूवन बर्डा येथील आदिवासी कलाकारांनी पारंपरिक दुर्मिळ होत चाललेल्या सांस्कृतिक कला सादर केली यामध्ये ढाक भक्ती वादन, मांदोळ, घांगळी वादन, थाळ गायन,डेरा वादन आदी कला सादर करीत कोल्हापूरच्या कलाप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले.या विविध प्रकारच्या कला सादर करण्यासाठी राज्य भरातून सोलापूर, पंढरपूर, परभणी, पुणे, सातारा, नाशिक, पालघर, अमरावती, राधानगरी, आष्टा गगनबावडा, शिरोळ, अहिल्यानगर आदी ठिकाणाहून कलाकार सहभागी झाले होते. तालुक्यातून डेरा वादनात कौशल्य गावित, जनी हाडस, सुंदरी वार्डे, कुसूम पवार, राहीबाई चव्हाण, भागी चौधरी यांनी डेरा वादन गायन केले.गणपत गावित, तुकाराम हाडस, मधुकर चव्हाण, सदू बागुल, शिक्षक कलाकार रतन चौधरी यांनी पारंपरिक मांदोळ नृत्य सादर केले तर वांगण येथील घांगळी वादक गायक भास्कर म्हसे यांनी कथा सादर केली. कलाकारांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, बुके देऊन गौरवण्यात आले. आदिवासी समाजात असलेला पारंपरिक सांस्कृतिक वारसा, कला,संस्कृतीचे जतन व संवर्धन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालया कडून होत असल्याने डांगी, कोकणी साहित्य बोली भाषा अभ्यासक शिक्षक रतन चौधरी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. या निमित्ताने यावेळी एरव्ही घर संसारात रमलेल्या आदिवासी महिला भगिनी कोल्हापूरची महालक्ष्मी, शाहू महाराज राजवाडा, रंकाळा तलाव, जोतिबा देवस्थान, जेजुरी गड आदींचे पर्यटन झाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला होता.
फोटो कॅप्शन # कोल्हापूर येथे डेरा वादन करतांना आदिवासी महिला भगिनी.
# घांगळी वाद्य वाजवितांना वांगण येथील कलाकार भास्कर म्हसे.
# ढाका व मांदोळ वाद्य वाजवितांना बर्डा श्री भुवन येथील कलाकार