महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पुण्यस्मरणा निमित्त वृक्ष लागवड

पांडाणे : प्रतिनिधी २७
चांदवड तालुक्यातील धोडांबे येथे वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त वृक्ष लागवड करण्यात आली.धोडांबे येथिल परशराम (बापु)रकिबे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांचा जिवनप्रवास हा केवळ श्रमसंस्कार नसुन तर निसर्ग आणि आध्यात्माच्या संयोगातुन समाजासाठी एक प्रकारे प्रेरणादायी होता .परशराम ( बापु ) हे अत्यंत निसर्गप्रेमी आणि अध्यात्मीक आवड असलेले व्यक्तीमत्व होते .त्यांनी आतापर्यंत गावातील सार्वजानिक ठिकाणे मंदिर परिसर शाळा अशा ठिकाणी अत्यंत कठीण खडकाळ जागेत सुद्धा एकुण दोनशे विस झाड़े जगवुन निसर्ग संवर्धनाचे सदैव स्मरणात राहील असे अव्दितीय उदाहरण समाजासाठी घालुन दिले आहे . त्यामुळे परशराम ( बापु ) यांना अध्यात्मा सोबतच निसर्गाचा साक्षीदार म्हणुन संबोधित असे .त्यांचे निसर्गावरील असलेले निस्सीम प्रेम पाहता त्यांच्या या कार्यातुन मिळालेली प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल म्हणुन त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त त्यांना विनम्र अभिवादन म्हणुन धोडांबे येथिल गोरक्षनाथ शाळेत वडाचे झाड लावुन एक नवा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.त्यावेळी त्यांचे बंधु राजाराम नामदेव रकीबे मुलगा डॉ .ज्ञानेश्वर रकीबे,संजय रकीबे,नातु . पुतणे विजय रकीबे,कैलास रकीबे, सुनील रकीबे व समस्त रकीबे परिवार उपस्थित होता
वृक्ष लागवड करतांना रकीबे परीवार आणि आप्तेष्ठ नातेवाईक ( छाया केशव पाटील )

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने