महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पेठ तलावात आढळला अनोळखी मृतदेह


पेठ । शहरातील बस स्टॅन्डनजीक असलेल्या तलावात एका 25 ते 30 वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला.
तलावातील पाण्यात पाणवेलीनजीक एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत पेठ पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके. यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या तरुणाच्या डाव्या हाताचे कांबीवर हेमलता असे नाव गोंदलेले आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास पेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने