बोरगाव - प्रतिनीधी
सुरगाणा तालुक्यातील वणी-सापुतारा मार्ग हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. याच मार्गावर हतगड परिसरात रस्त्यालगत हॉटेलच्या जाहिरातीचे होर्डिंग लावण्यात आले आहे. हे होर्डिंग रस्त्याच्या अगदी जवळ असल्यामुळे वाहनचालकांना गाडी साईड घेताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वणी-सापुतारा हा मुख्य पर्यटक मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अरुंद आणि वळणदार रस्त्यावर हे होर्डिंग असल्यामुळे मोठ्या वाहनांना (ट्रक, बस) साईड घेण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यामध्ये धुके असल्यास हे होर्डिंग स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे अचानकपणे वाहन थांबवावे लागते.
याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या होर्डिंग्सच्या नियमनासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या अपघातांना तोंड द्यावे लागू शकते.